बीएल संतोष यांची भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती

91

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

बीएल संतोष यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रामलाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख पदी नेमण्यात आले आहे. तब्बल 13 वर्षानंतर रामलाल हे संघात परत आले आहेत.

रामलाल हे मथुराचे रहिवासी आहेत. 2006 साली संजय जोशी यांच्याकडून महासचिवपद काढून रामलाल यांच्याकडे सोपवण्यात आले होते. रामलाल हे भाजपचे मोठे रणनितीकार समजले जात होते. प्रत्येक बैठकीत त्यांची उपस्थितीत असायाची. संघटना सचिव हे पद म्हणजे भाजप आणि संघामधील दुवा समजलं जातं

आपली प्रतिक्रिया द्या