
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने सोमवारी पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या वाहनावर हल्ला केला. बलुचिस्तानच्या मांड भागात माहिर आणि रुदिग दरम्यान हा हल्ला झाला. या हल्ल्यात पाच पाकिस्तानी सैनिक जागीच ठार झाले. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. BLA ने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनासाठी सापळा रचला होता. त्यांनी या लष्करी वाहनाला लक्ष्य केले आहे.
हा हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने स्विकारली आहे. माहिर आणि रुदिग यांच्यामध्ये मांड परिसरात हा हल्ला झाला. सापळा रचून पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यात पाच पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे.
याआधी सप्टेंबरमध्ये बलुचिस्तानमधील मास्तुंग येथील दश्त भागात रेल्वे ट्रॅकवर झालेल्या स्फोटात जाफर एक्सप्रेसचा एक डबा उद्ध्वस्त झाला आणि इतर सहा डबे रुळावरून घसरले. त्यात १२ प्रवासी जखमी झाले. तसेच १० ऑगस्ट रोजी मास्तुंग जिल्ह्यात आयईडी स्फोटात ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरल्याने चार जण जखमी झाले. ४ ऑगस्ट रोजी कोलपूरजवळ क्लिअरन्ससाठी पाठवलेल्या पायलट इंजिनवर गोळीबार झाला. फुटीरतावादी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.