‘ब्लॅक राईस’च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी, वादळी वाऱ्य़ात धान्य जमिनीवर लोळले

आयुर्वेदिक तांदूळ अशी ओळख असलेल्या काळ्या तांदळाचा प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला. धान पिक चांगले जमून आले मात्र शेतकऱ्याचा या प्रयोगावर निसर्गाने पाणी फेरले आहे. वादळी पावसाने धान जमिनीवर लोळले.

मोठ्या उत्साहाने काळ्या तांदळाची शेती करणाऱ्या केलिचंद झाडे या तरूण शेतकऱ्याचा प्रयोग निसर्गाच्या लहरीपणाने अयशस्वी ठरला आहे. गोंडपिपरी तालुक्यात प्रथमच ब्लॅक राईसची लागवड करण्यात आली. तालुक्यातील धाबा गावातील केलिचंद झाडे या तरूणाने प्रायोगिक तत्वावर तीन धान बांद्यात तीन किलो बिजाई रोवली. धान चांगले जमून आले. या धानाने सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेक शेतकऱ्यांनी झाडे यांच्याशी संपर्क साधून धानाची माहीती घेत होते. मात्र मागील आठवड्यात आलेल्या वादळी पावसाने काळ्या धानाला जमिनीवर लोळविले. धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यशस्वी झालेल्या प्रयोगावर निसर्ग कोपला. मात्र या संकटाने खचून न जाता पुढच्या वर्षी संपुर्ण शेतात काळ्या धानाची लागवट करणार असल्याची माहीती केलिचंद झाडे या तरूण शेतकऱ्याने दिली. तांदळाचे फायदे देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे. त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. काळ्या तांदळाला मोठी मागणी आहे. त्यामुळे किमंतही चांगली मिळते. शेतकऱ्यासाठी हा धान फायदेशीर ठरणारा आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या