
निवडणूक आयोगाकडून मतदार पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, मात्र त्या मोहिमेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. वाशीम जिह्यातील रिसोड शहरात या मोहिमेदरम्यान नवनाथ मुंढे या बीएलओला तीन इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे.
नवनाथ मुंडे रिसोड शहरात 2024 च्या पुनर्मतदान प्रक्रियेच्या प्रत्यक्ष पडताळणी व मॅपिंगसाठी गेले होते. त्यावेळी तीन इसमांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यात जखमी झाल्याने मुंढे यांना उपचारासाठी वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर या घटनेनंतर फरार असून हल्ल्यामागचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
























































