मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅन्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून 17 ते 19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी 47/900 व लोणावळा कि.मी. 50/100 येथे, 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. 44/800 व खालापूर कि.मी. 33/800, 19 ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. 37/800 व कि.मी. 37, 26 ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. 47/120 तर खोपोली एक्झीट कि.मी. 39/900 वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे. काम पूर्ण झाल्यावर दुपारी 1 वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.