नारी शक्तीचा रक्तदानाचा महायज्ञ; तब्बल 34 महिलांनी केले रक्तदान

राज्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या रक्तटंचाई दूर करण्यासाठी भांडूप येथील महिलावर्गांने महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर उचलली आणि ती यशस्वीरीत्या निभावली देखील. ‘भांडूपकर रक्तवीर’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 34 महिलांनी रक्तदान करून रक्तदानाच्या महायज्ञात महत्त्वाची भूमिका बजाविली. या शिबिराचा शुभारंभ राजोल संजय पाटील यांनी रक्तदान करून केला.

राज्यातील रक्ताचे तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याची गंभीर दखल घेत ‘भांडूपकर रक्तवीर’तर्फे नुकतेच येथील साई विहारच्या मुख्य प्रवेशद्वारालगत रक्तदानाचे आयोजन केले होते.

महिलांनी आयोजित केलेले हे शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपन्न झाले. यावेळी 34 महिला रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी रक्तदात्यास प्रमाणपत्र, तुळसी वृंदावन आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टर्स व  स्टाफचे सहकार्य लाभले. शितल भोवड, शीतल मोहिते, दीक्षा कदम, सिमरन गमरे, विश्वास दाते व मिलिंद करंजे यांनी या रक्तदान शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या