वांद्रे पश्चिममध्ये रक्तदान शिबीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने देशभर सेवा सप्ताह आयोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे पश्चिम विभागात भाजपच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात संकलित केलेल्या 100 रक्ताच्या बाटल्या जोगेश्वरी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या रक्तपेढीत जमा करण्यात आल्या.

भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे रेक्लमेशन येथे हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या आठवड्यात या भागात डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप, कानचे मशीन वाटप कॅम्प, तसेच रुग्णालयात फळवाटप आणि स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या