मिलिटरी स्कूलमध्ये रक्तदान शिबीर

ओशिवरा येथील रायगड मिलिटरी या सीबीएसई बोर्ड स्कूलमध्ये सक्षम संस्थेच्या सहकार्याने 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जोगेश्वरी, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड मिलिटरी शाळेने केले आहे. या शिबिरासाठी सर्व सुव्यवस्था रायगड मिलिटरी स्कूलच्या संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.