
सार्वजनिक रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तपेढ्यांच्या आवाहनाला मुंबई विद्यापीठाने नेहमीप्रमाणेच साद दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने मुंबईतील विविध 18 रेल्वे स्थानकांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सुमारे 1,195 युनिट रक्तसंकलन करण्यात आले आहे. हे रक्तसंकलन सार्वजनिक रुग्णालयातील रक्तपेढ्यांकडे जमा करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध संलग्नित महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला.


























































