
जगातील अब्जाधीशांची यादी ब्लूमबर्गने जारी केली असून यामध्ये अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची संपत्ती 400 अब्ज पार गेली आहे. अवघ्या एका दिवसात त्यांच्या संपत्तीत 19 अब्ज डॉलरहून अधिक संपत्तीची भर पडली आहे. लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत यावर्षी 157 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मस्क यांच्या संपत्तीत 19.4 अब्ज डॉलर म्हणजेच 17 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. मस्क यांनी आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे. मस्क यांची एकूण संपत्ती 419 अब्ज डॉलर आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ पाहायला मिळाली आहे. अंबानी यांच्या संपत्ती 944 मिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 98.9 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. ते जगात श्रीमंतांच्या यादीत 18 व्या नंबरवर आहेत.