बाप रे बाप…! लाल गुलाबावर बसला निळा साप, व्हायरल होतोय व्हिडीओ खास

जगभरात अनेक प्रकारचे साप आढळून येतात. छोट्याशा सुतळी पासून तो अगडबंब अजगरापर्यंत अनेक आकाराचे, प्रजातीचे, रंगाचे साप तुम्ही पाहिले असतील. पण कधी निळ्या-आकाशी रंगाचा साप पाहिलाय का? नाही ना. मात्र सध्या सोशल मीडियावर अशाच एका निळ्या सापाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

निळ्या रंगाचा साप पाहून लोक अचंबित होत आहेत असून हा जगातील सर्वात सुंदर साप असल्याचेही सुचित करत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एका लाल गुलाबावर निळा साप बसलेला दिसत आहे. निळा साप लाल गुलाबावर बसल्याने अधिकच खुलून दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 17 सप्टेंबरला अपलोड केलेला हा व्हिडीओ 1 लाख 25 हजारांहून अधिक लोकांनी ट्विटरवर पाहिला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील साप ब्लु पिट वायपर आहे. दिसायला हा साप देखणा असला तरी जगातील घातक सापात याचा समावेश होतो. हा साप चावल्यास जवळपास मृत्यू निश्चित आहे. मॉस्को येथील एका झु मधील हा व्हिडीओ आहे. इंडोनेशिया आणि पूर्व तिमोर भागात हा साप प्रामुख्याने आढळतो.

बहुतांश पिट वायपर पांढऱ्या रंगात आढळतात, मात्र निळ्या रंगातील पिट वायपर दुर्मिळ आहे. या सापांचे वैशिष्ट्य म्हणजे निळ्या रंगांच्या सापाची जोडी हिरव्या रंगाच्या सापाला जन्म देऊ शकतात, असे मॉस्को येथील प्राणी संग्रहालयाचे जनरल डायरेक्टर स्वेतलाना अकुलोवा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या