अतिवृष्टीमुळे महापालिका आयुक्तांची विविध ठिकाणांना भेट; परिस्थितीची पाहणी

574

मुंबई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरातील रस्त्यांवर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहेत. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.आयुक्त चहल यांनी वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. तसेच मिलन सबवे येथील परिसराची पाहणी केली, तसेच ‘अंधेरी सबवे’ ची पाहणी केली आणि उपाययोजनांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या