
मुंबईतील बेकायदा बांधकामांची पालिकेने गंभीर दखल घेत धडक कारवाई केली आहे. गेल्या सहा वर्षांत पालिकेकडे बेकायदा बांधकामांसंदर्भात तब्बल 67 हजार 809 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये 29 हजार 273 बेकायदा बांधकामांवर पालिकेने कारवाई केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्दय़ाचे उत्तर देताना पालिका प्रशासनाकडून हे उत्तर देण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मुंबईतील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण ‘जिओग्राफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’द्वारे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या प्रणालीसाठी पालिका 10 कोटी 28 लाख रुपये खर्च करणार आहे. मात्र हे करीत असताना पालिकेकडे सद्यस्थितीत असलेल्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे किती तक्रारी आल्या आणि त्यावर कोणती कारवाई केली याबाबत पालिका प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामार्फत केली होती.
आता अतिक्रमणे सॅटेलाइटने शोधणार
मुंबईतील बेकायदा बांधकामे, अतिक्रमणांचा सॅटेलाइट पद्धतीने घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे 1990 ते 2020 पर्यंतच्या सॅटेलाइटकरून घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यानंतर भकिष्यात अनधिकृत बांधकामांकर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.


























































