
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी राज्यात सत्तास्थापन करताना रुसून गावाला जाऊन बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेल मुक्कामी येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या सत्तेतील वाटय़ासाठी दबावतंत्र की नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने शिंदे गटावर पुन्हा ‘काय ते हॉटेल…’ची वेळ आल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वेळी मुंबईत एक-दोन वर्षे स्थायी समिती तसेच अडीच वर्षं महापौर पदाची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मात्र भाजपने ती मान्य केली नव्हती. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना महापौर पदासाठी शिंदे गटाची साथ लागणार आहे. हे लक्षात घेता शिंदे गटाकडून पुन्हा हॉटेल पॉलिटिक्सच्या माध्यमातून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे.
z शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
z महापौर निवडीपूर्वी राजकीय खेळी आणि दबावतंत्र वापरले जाण्याची शक्यता गृहीत धरूनच शिंदे गटाने हा विशेष प्लॅन आखल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय उलथापालथ टाळणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदेंची कॅबिनेटला दांडी
निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. भाजपसोबत राहूनदेखील काहीच फायदा न झाल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही त्यांनी बैठकीला जाणे टाळले, तर अजित पवार पुण्यात होते.
z भाजपने आतापर्यंत फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेचा खेळ केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करताना भाजपला किती काळ ताणून धरायचे हा प्रश्न शिंदे गटापुढे आहे. दुसरीकडे भाजपवगळता सत्ता स्थापनेचा प्रयत्न झाला पिंवा भाजपकडूनच काही दगाफटका होऊन नगरसेवक फुटण्याची भीती शिंदे गटाला सतावत आहे.
आता भाजपच्या मित्रांनाच ऑपरेशन लोटसची भीती
विरोधी पक्षातील उमेदवार पळवणे, पक्ष पह्डणे, विरोधी पक्षाला कोणतीच मदत मिळू नये असे सर्व प्रकार सत्ताधारी भाजपकडून करण्यात आले. ‘ऑपरेशन कमळ’ करून भाजपने विरोधी पक्ष फोडले. पण आता या ‘ऑपरेशन कमळ’ची भीती भाजपच्या मित्रपक्षांनाही वाटू लागली आहे. या भीतीनेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे विजयी नगरसेवक लपवावे लागत आहेत, असे काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत म्हणाले.































































