फेबुवारीअखेरपर्यंत पंधरा हजार फेरीवाल्यांना जागा द्या

769

मुंबईत फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या 85 हजार जागांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 15 हजार फेरीवाल्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत जागा वितरित कराव्यात असे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित पालिका अधिकाऱयांना दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

पालिकेने 2014 मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सवा लाख अर्ज वितरित करण्यात आले होते. यात 99,435 फेरीवाल्यांनी पालिकेकडे जागेसाठी अर्ज भरले होते. या फेरीवाल्यांकडून प्रशासनाने अधिवासाच्या प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवली होती. यामध्ये पालिकेकडे अर्ज केलेल्यांपैकी आतापर्यंत सर्वेक्षणात केवळ 15 हजार 120 फेरीवाले पात्र ठरले आहेत. मात्र पालिकेने फेरीवाल्यांसाठी एपूण 85 हजार जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना जागा वितरित करा, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

  • फेरीवाला क्षेत्र असणारे एकूण रस्ते -1366
  • फेरीवाल्यांच्या एपूण जागा – 85,891
  • दाखल झालेले एपूण अर्ज – 99,435
  • पात्र फेरीवाले – 15,120

अशा आहेत अटी…

फेरीवाला पात्रतेसाठी पालिकेने घातलेल्या अटींमुळे 51,785 फेरीवाल्यांनीच आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. या अटींमध्ये परवाने देण्यासाठी फेरीवाल्याचे वय 14 पेक्षा जास्त असावे, 1 मे 2014 पूर्वीपासून फेरीवाल्याचा व्यवसाय असावा, संबंधित व्यक्ती हिंदुस्थानचा नागरिक असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्रातील अधिवासाचा दाखला असावा अशा अटी घालण्यात आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या