पालिकेने ४८ तासांत बुजवले शेकडो खड्डे

270

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत असताना मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पडलेले शेकडो खड्डे ४८ तासांत बुजवले आहेत. पालिकेने रहिवाशांना तक्रारी आणि सूचनांसाठी मोबाईल अॅप, वेबसाईट आणि ट्विटर उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या सूचनांची दखल घेणे आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य झाले आहे. काही तासांतच असे खड्डे बुजवत मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेचे ७० हजारांहून जास्त कर्मचारी दरदिवशी मुंबईच्या विविध भागांत कार्यरत आहेत. कोरोनाचे संकट असतानाच मुंबईत गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम पालिकेचे रस्ते आणि वाहतूक विभाग करत आहे. मुंबईकरांना उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल अॅप, वेबसाईट आणि ट्विटर अकाऊंटवरून आतापर्यंत पालिकेकडे १४६ खड्डयांच्या तक्रारी आल्या. त्यांची तात्काळ दखल घेत पालिकेने आतापर्यंत १०९ खड्डे बुजवले आहेत तर उर्वरित ३७ खड्डे पुढील ४८ तासांत बुजवले जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

इथे नोंदवा तक्रार
– `MyBMCPotholeFixIt’
– portal.mcgm.gov.in
– mybmcpotholefixit.com
– दूरध्वनी – 1916 तसेच 1800-22-12-93 टोल फ्री क्रमांक
– ट्विटर अकाऊंट- @mybmc

आपली प्रतिक्रिया द्या