बेकायदा पार्किंग एका महिन्यात  67 लाखांची वसुली, 1041 वाहनचालकांना दणका

201

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेने मुंबईभरात बेकायदा पार्किंगविरोधात 7 जुलैपासून सुरू केलेल्या कारवाईत महिनाभरात तब्बल 67 लाख 65 हजार 565 रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये एकूण 1041 वाहनांकर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पालिकेने  7 जुलैपासून बेकायदा पार्किंगविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या पार्किंगपासून 500 मीटर परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास दहा हजारांपर्यंत दंड वसूल केला जात आहे. यामध्ये अवजड वाहनासाठी बेकायदा पार्किंगबद्दल दहा हजार व टोचन 5 हजार असे 15 हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत. तर चारचाकी वाहनासाठी टोचनसह 10,000 रुपये, दुचाकीसाठी 5,000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. पालिकेच्या वाहनतळांपैकी 26 ठिकाणी यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पालिकेच्या एकूण सात परिमंडळांपैकी परिमंडळ 2 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 9,27,055 रुपये दंड कसुली करण्यात आली, तर परिमंडळ 5 मध्ये सर्वात कमी म्हणजे 30,110 रुपये दंडवसुली करण्यात आली.

26 पार्किंग परिसरात कारवाई

मुंबईत पालिकेच्या 26 वाहनतळांच्या परिसरात दंडात्मक कारवाई सुरू आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा वाहने पार्क करणार्‍यांची धावपळ उडत आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांतच 243 वाहनांकर कारवाई होऊन 8 लाख 69 हजार 800 एकढी दंडवसुली करण्यात आली. तर आता वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात शिस्त लागल्याचे निदर्शनास येत असून 67 लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई जप्त वाहने

चारचाकी      684

तीनचाकी      24

दुचाकी       333

आपली प्रतिक्रिया द्या