सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेच्या जागेवरील गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या ताब्यात असलेल्या शिवडी येथील वेस्टर्न इंडिया मिलच्या भूखंडावर ही घरे बांधण्यात येतील. सुधार समितीच्या भूखंडांच्या पाहणी दौऱयानंतर संबंधित प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. मात्र या प्रस्तावावरून शिवसेनेला कोंडीत पकडून राजकारण करण्याचा विरोधक आणि भाजपचा प्रयत्न फसला.
मुंबईतील बंद असलेल्या कापड गिरण्यांचे सहा भूखंड ‘म्हाडा’ पालिकेला देणार आहे. या जागांकर पालिका सहा अद्ययाकत उद्याने उभारणार आहे. यामध्ये पालिकेला ‘म्हाडा’कडून एकूण 3873.83 चौरस मीटरचे सहा भूखंड मिळणार आहेत. या भूखंडांच्या बदल्यात पालिका ‘म्हाडा’ला शिकडी येथील वेस्टर्न इंडिया लि. मिलची 3607.83 चौरस मीटर जागा देणार आहे. मात्र या प्रस्ताकात चुका असल्याने भूखंडाची पाहणी झाल्यानंतर मंजूर करावा अशी भूमिका शिवसेनेने गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत घेतली. मात्र विरोधकांसह भाजपने शिवसेनेवर नाहक आरोप करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर आज सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांच्यासह विरोधक, भाजपनेही संबंधित जागांचा पाहणी दौरा केला. यावेळी प्रशासनाने बनवलेल्या प्रस्तावात चुका असल्याचे स्पष्ट झाले. या चुका सुधारण्याचे निर्देश दिलीप लांडे यांनी प्रशासनाला दिले. यानुसार सुधार समितीने ‘म्हाडा’कडून मिळणाऱया सहा भूखंडांची पाहणी केल्यानंतर आज हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आज झालेल्या बैठकीत नगरसेवक राजू पेडणेकर, अनंत (बाळा) नर, रमाकांत रहाटे, नगसेविका किशोरी पेडणेकर, किरण लांडगे यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली.
श्रेय घेण्यासाठी विरोधक-भाजपचा आटापिटा
गिरणी कामगारांना परवडणारी घरे मिळावित अशी भूमिका शिवसेनेने पहिल्यापासूनच घेतली होती, मात्र प्रस्तावात चुका असल्यामुळे पाहणी केल्यानंतरच प्रस्ताव मंजूर करावा असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले. मात्र विरोधक आणि भाजपने गुरुवारच्या बैठकीत गोंधळ घालून प्रस्तावाच्या मंजुरीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेने बहुमताने प्रस्ताव राखून ठेवत आज पाहणी करून मंजूर केला. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करून श्रेय घेण्याचा आटापिटा विरोधक भाजपच्या चांगलाच अंगाशी आला.
























































