मुंबईचा महापौर शिवसेनेचाच! किशोरी पेडणेकर यांनी भरला अर्ज

5927

मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे. भाजपने महापौर पद निवडणुकीतून माघार घेतली, तर विरोधी पक्षांकडून अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे त्यामुळे महापौर पदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर पदी शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांची निवड बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 21 नोव्हेंबरला संपत असल्याने बुधवारी मंत्रालयातून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱ्या वेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले. त्यामुळे पालिकेच्या सर्व 222 नगरसेवकांना महापौरपदासाठी अर्ज करण्याची संधी होती.

kishori-pednekar

गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 22 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुकांना संबंधित पालिकेच्या चिटणीस खात्याकडे अर्ज सादर करता येणार होता. मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांनी अर्ज दाखल केला आहे. इतर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल न केल्याने आता 22 नोव्हेंबरला होणाऱ्या या दोघांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे.

सध्याचे संख्याबळ –
एकूण नगरसेवक    222
शिवसेना              94
भाजप                83
काँग्रेस                28
राष्ट्रवादी               8
सपा                   6
मनसे                  1
एमआयएम             2

आपली प्रतिक्रिया द्या