तीन दिवसांत 358 बेकायदा बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर!

पालिकेने बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली असून तीन दिवसांत तब्बल 358 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. यामध्ये सोमवारी ‘एन’ विभागात 61, मंगळवारी दहिसर नदीमधील 95 आणि आज गोरेगाव नाल्यातील तब्बल 202 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. आज केलेल्या कारवाईमुळे गोरेगावचा 9 फुटांचा शास्त्र्ााrनगर नाला 22 फूट रुंद होणार असल्यामुळे मोतीलाल नगर,शास्त्रीनगर आणि सिद्धार्थनगर परिसराची पाणी साचण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.

पालिकेच्या परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या मार्गदर्शनात व मुंबई पोलिसांच्या विशेष सहकार्याने गोरेगाव पश्चिम परिसरात करण्यात आलेल्या कारकाईदरम्यान शास्त्राrनगर नाल्याच्या उत्तर बाजूला नाल्यालगत असणारी 202 अनधिकृत बांधकामे बुधवारी तोडण्यात आली. यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी लिंक रोड ते मालाड खाडीदरम्यान असणाऱया सुमारे 1 हजार 476 फूट लांबीच्या शास्त्राrनगर नाल्याच्या पात्राची रुंदी सध्याच्या 9 फुटांकरुन 22 फूट करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने नाल्याच्या रुंदीकरणाचे काम लगेचच हाती घेण्यात आले आहे. ज्यामुळे येत्या पाकसाळ्यात या नाल्याची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता अडीच पटींनी वाढणार असून गोरेगाव पश्चिम परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती ‘पी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देकिदास क्षीरसागर यांनी दिली. गोरेगाक पश्चिम परिसरात बांगूरनगर पोलीस ठाण्यातील करिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या नेतृत्वात 40 पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तर पालिकेचे 90 कामगार – कर्मचारी – अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर हजर होते. या कामासाठी जेसीबी, पोवलेन आणि डंपर यासह इतर आवश्यक साधनसामग्रीचाही वापर करण्यात आला.

दक्षिण बाजूची 358 बांधकामेही हटवणार

अनधिकृत बांधकामांविरोधातील कारकाईच्या पुढील टप्प्यात शास्त्राrनगर नाल्यालगत दक्षिण बाजूला असणारी 358 बांधकामे हटविण्याचे प्रस्ताकित आहे. या बाबतची नियोजनात्मक कार्यकाही सध्या सुरू असून दक्षिण बाजूची 358 बांधकामे हटविल्यानंतर सदर नाल्याच्या पात्राची रुंदी 49 फूट करणे शक्य होणार आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त क्षीरसागर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या