
मिऱ्या समुद्र किनारी अलीना नावाची एक मच्छिमार नौका बुधवारी रात्री एक वाजता बुडाली. नौकेवर पाच खलाशी होते. त्यापैकी चौघांनी पोहत किनारा गाठला. एक जण अद्याप बेपत्ता आहे. बचावलेल्या पाच जणांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.
बचावलेल्या चार जणांमध्ये रेबर उमर जांभारकर वय 54 रा पडवे राजापूर, विकास चौधरी वय 20आसिफ जांभारकर वय 50, मुश्ताक भाटकर सर्व रा.राजिवडा रत्नागिरी यांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्या खलाशाचे नाव रामचंद्र पवार आहे.

























































