आधी पाकव्याप्त कश्मीर सोडा! ब्रिटिश खासदाराने पाकला ठणकावले

192

पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच भूभाग असून पाकिस्तानने तो तत्काळ हिंदुस्थानच्या ताब्यात द्यावा, अशा शब्दांत ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानला ठणकावले. इंग्लंडमध्ये वसलेल्या कश्मिरी पंडितांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात संयुक्त राष्ट्रांत याबाबत एक प्रस्ताव सादर करीत आहे, मात्र ते या आधीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पाकव्याप्त कश्मीर हा जम्मू-कश्मीरचाच हिस्सा आहे व तो त्यातच समाविष्ट केला जावा. त्यामुळे संपूर्ण जम्मू- कश्मीर हा हिंदुस्थानचा भूभाग आहे व पाकिस्तानने सर्वप्रथम तेथून आपले लष्कर हटवावे आणि त्यांच्या ताब्यात असलेले कश्मीर हिंदुस्थानच्या ताब्यात द्यावे अशा शब्दांत ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानची कानउघाडणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या