मीच तिला मारलंय, मीच तिच्या मृत्यूला जबाबदार! बॉबी डार्लिंग आईच्या आठवणीत ढसाढसा रडली

ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने टीम इंडियाचा माजी गोलंदाज मुनाफ पटेलबाबत केलेले एक विधान चर्चेचा विषय ठरले होते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत मोठी माहिती उघड केली. माझ्या आईच्या मृत्युला मीच जबाबदार असल्याचं बॉबी डार्लिंगनं सांगितलं.

काही दिवसांपूर्वी बॉबी डार्लिंगने तिच्या आईच्या मृत्यूबद्दल एक विधान केलं. आईबद्दल बोलत असताना ती धाय मोकलून रडली. माफ कर आई, मी काय करू शकते? कोणीही समजू शकलं नाही. तुही मला समजलं नाही…तू वर गेलीस. मी इथेच राहिले. मी जगाला तोंड देतेय. मी एकटीच माझी लढाई लढतेय. मी काय करावं? देवानं मला असं का बनवलं? ही माझी चूक नाही…, असे म्हणत बॉबी ढसाढसा रडली.

मला खूप वाईट वाटतंय. मलाही अपराधी वाटतंय की, माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे… मी जबाबदार आहे… आई, प्लीज… मी माझ्या आईचे दागिने चोरले आणि घरातून पळून गेले. मी ते चांदणी चौकात विकले देखील. ते माझ्या आईच्या लग्नाचे दागिने होते, ते मी विकले. त्याचे मला 30 हजार रुपये मिळालेले. मी परदेशातून परत आल्यावर पप्पांनी मला सांगितलं की, तुझी आई म्हणाली की, तुझा सर्वनाश होऊन जाऊ दे… तेव्हा पप्पांनी आईला समजावलेलं की, शाप देऊ नकोस. पण आईच्या तोंडून आधीच निघालेलं की, मी बर्बाद व्हायला हवं आणि पाहा मी झालेय, असे तिने सांगितले.

बॉबी डार्लिंग पुढे बोलताना म्हणाली की, “जेव्हा मी हाँगकाँगला निघून गेले तेव्हा मी आईला फोन केला आणि म्हणाले की, मम्मी मी ठीक आहे. मला तुझी खूप आठवण येतेय. मी तुझा मार आणि तुझ्या हातचं जेवण हे सगळं खूप मिस करतेय. मम्मी दुःखात होती. तिची किडनी डॅमेज झालेली. माझी आई, माझा विचार करत, काळजी करत देवाघरी निघून गेली. मीच माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे. मीच तिला मारलंय. आई मला माफ कर, असे बॉबी डार्लिंग म्हणाली.

ते प्रेम नाही फक्त ‘वन नाईट स्टँड’, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचे नाव घेत बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा