​लातूरात महावितरणच्या डिपीमध्ये मृतदेह

29

सामना प्रतिनिधी । लातूर

शहरात महावितरणच्या उघड्या डिपीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र उशीरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नव्हता.

शहरातील विवेकांनद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेबर कॉलनीमध्ये असणाऱ्या महावितरणच्या उघड्या डि.पी.मध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षाचे वय असणारा हा इसम सकाळी पावसापासून बचाव व्हावा म्हणून उघड्या डिपीमध्ये गेला असावा आणि शॉक लागून तो घटनास्थळीच मरण पावला असावा. शहरात शटरला ग्रिस लावण्याचे काम करणारी हीच व्यक्ती असल्याचे कांहीजण सांगत होते.

आपली प्रतिक्रिया द्या