बुलढाण्यात बोलेरो व कंटेनरची जबर धडक, चार जण जागीच ठार

75

सामना प्रतिनिधी । मेहकर

मेहकर-अकोला रस्त्यावर अंजनी गावाजवळील राजा ढाबा जवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले.

संभाजीनगर येथील खडकेश्वर मधील मनोहर क्षीरसागर हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. तेथून परत संभाजीनगरला आपल्या गावी बोलेरो गाडी क्र एमएच 20 ईई 6746 ने येत असताना विरुद्ध दिशेने सिमेंटने भरलेला कंटनेर क्र. एमएच 26 एडी 3541 ने वळण घेत असताना चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटला व कंटेनर बोलेरो गाडीवर जाऊन आदळले. बोलोरो गाडी किमान 40 फूट फरफटत जाऊन एका खड्ड्यात गेली. या अपघातात एकाच कुटुंबातील मनोहर क्षीरसागर (70), पत्नी नलिनी मनोहर क्षीरसागर (65) व मुलगी मेघा मनोहर क्षीरसागर (31) व चालक गजानन नागरे (24) हे जागीच ठार झाले.

दुर्घटनेनंतर अंजनी गावातील नागरिक व डोणगाव येथून पोलिसांना बोलावले. दीड तासानंतर बोलेरो चालकास बाहेर काढले मात्र तो मरण पावला. तो संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी आहे. तर इतर तिघेही जागीच ठार झाले होते. क्षीरसागर यांचे नातेवाईक अ‍ॅड. शशांक बिडकर (सिडको, संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघात घडताच कंटेनर चालक घटनास्थळवरून फरार झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या