बॉलिवूडचे खलनायक सलीम घोष यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे खलनायक सलीम घोष यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांनी कलयुग, सोल्जर, मंथन, कोयला, चक्र, सारांश, सरदारी बेगम, मोहन जोशी हाजिर हो, त्रिकाल, आघात अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सलीम घोष यांनी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि मलयाळम चित्रपटात काम केले आहे. तसेच टेलिव्हिजनवरील मालिकांमध्येही ते खलनायकाच्या रुपात दिसले आहेत. अभिनेता विवान शाह याने सलीम घोष यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरवरून शेअर केले आहे.