हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या अभिनयामुळे कायम चर्चेत असते. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून तिने अनेक हिट सिनेमे केले आहेत. अलिकडेच मुंज्या आणि महाराज या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. आता नुकतेच शर्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मिनी ड्रेस मधील काही फोटोस शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
शर्वरीने व्हिएतनाममधील एका सुप्रसिद्ध डिझायनर चाऊफामचा मिनी ड्रेस घातला आहे. ज्याचे नाव जोआना मिनीड्रेस असे नाव आहे. हा बॅलेट-कोर नावाने देखील ओळखला जातो. याला पाकळ्यांच्या आकाराचा स्कर्टमुळे आणखी शोभा आली आहे. या ड्रेसमध्ये शर्वरी एखाद्या बाहुलीसारखी दिसत आहे. या ड्रेसवर तिने गोल्डन इअररिंग्स घातले आहेत. त्याचबरोबर न्यूड मेकअप केला आहे.