पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर बनणार चित्रपट 

645

माजी पत्रकार जिग्ना वोरा यांनी तुरुंगात लिहलेल्या पुस्तकारावर चित्रपट बनणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी वोरा यांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांनी तुरुंगात असताना ‘बिहाइंड बार्स इन भायखळा’ हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचा सात वर्ष तुरुंगात असतानाचा प्रवास आणि तरुंगात असणाऱ्या महिलांविषयी लिहिले आहे.

11 जून 2011 रोजी पवई हिरानंदानी येथे दिवसाढवळ्या जे.डे यांची गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी असणारी एकमेव महिला वोरा यांना याच वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. अन्य आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निखाळजे उर्फ छोटा राजन याचा समावेश आहे. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुस्तकाचे सह प्रकाशक हुसेन जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रोडक्शन हाऊसने या पुस्तकाचे मालकी हक्क विकत घेतले असून, यावर लवकरच चित्रपट बनवण्यात येणार आहे. तसेच वोरा यांनी लिहिलेले पुस्तक हे महिला कैद्यांच्या हितांवर आधारित कटू सत्य सांगणारे पुस्तक असल्याचे ही ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या