मुंबईनं सर्व काही दिलं! सतीश कौशिक यांनी व्यक्त केली कृतज्ञता

555

मुंबई शहरानं सर्क काही दिलं, अशी कृतज्ञता अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सतीश कौशिक यांनी व्यक्त केलीय. यासंदर्भातील सतीश कौशिक यांचे ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. कौशिक यांनी आपल्या भाकना व्यक्त करताना लिहिलंय, मी 9 ऑगस्ट 1979 रोजी पश्चिम एक्प्रेसने मुंबईत आलो. 10 ऑगस्ट ही माझी मुंबईतील पहिली सकाळ होती. मुंबईने मला मित्र दिले, काम दिलं, पत्नी-मुलं आणि घर दिलं. खूप सारं प्रेम दिलं. संघर्ष सुरू राहिला. कधी यश तर कधी अपयश हाती गवसलं. आनंदानं जगायचं बळ या शहराने दिलं. गुड मॉर्निंग मुंबई. ज्यांनी मला स्कप्नांपेक्षाही खूप काही जास्त दिलं त्या सर्वांचे आभार.

सतीश कौशिक यांचे ट्किट नेटिजन्सला खूप भावलं आहे. त्यावर हजारो रिट्किट आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनीही कौशिक यांना या पोस्टबद्दल खूप साऱया शुभेच्छा दिल्या आहेत. यात शेखर कपूर, रेखा भारद्वाज, उर्मिला मातोंडकर यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या