CSK VS KKR आयपीएलचा सामना सुरू असतानाच ईडन गार्डन्सवर बॉम्ब ठेवल्याचा मेल, सुरक्षेत वाढ

ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट आहे. खबरदारी म्हणून देशभरातील अनेक विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच आयपीएलचा सामना सुरू असलेल्या ईडन गार्डन्स मैदानावर बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ईमेल पश्चिम बंगाल क्रिकेट बोर्डाला आला आहे.


ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना सुरू असताना हा ईमेल आला आहे. त्यानंतर ईडन गार्डन्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.