गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रवासी विमानांना बॉम्बच्या धमक्या येण्यांची मालिका सुरू आहे. शनिवारी एकाच दिवशी 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आल्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संपूर्ण तपासणीनंतर ही विमाने रवाना करण्यात आली, परंतु शेकडो प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा पेंद्रीय कार्मिक मंत्रालयाने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवून त्यांना कोळसा मंत्रालयात सचिव केले.
गेल्या आठवडय़ात विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, अकासा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या 70 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमक्या आल्या आहेत. सततच्या धमक्यांमुळे दिल्ली पोलिसांनी सहा एफआयआर नोंदवले आहेत. दुसरीकडे, विमानात बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणारी दहा सोशल मीडिया खाती सरकारने ब्लॉक केली.
एनआयए, आयबीकडून अहवाल मागवला
शनिवारी एकाच दिवशी 30 धमक्या आल्यानंतर पेंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच विमान पंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱयांची भेट घेतली. आपले आकाश पूर्णपणे सुरक्षित आहे, असे आश्वासन ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी त्यांना दिले