हायकोर्ट खंडपीठाला धमकीचा ई-मेल

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठ दुपारी 3 वाजेपर्यंत उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्रशासनाला होता. या ई-मेलची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक पथकाच्या पाच टीमने धाव घेतली. पोलिसांनी खंडपीठातील कामकाज न थांबविता कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाचही टीमच्या श्वानांच्या मदतीने खंडपीठाचा परिसर पिंजून काढला. 5 तास सुरू असलेल्या या तपासणी मोहिमेत पुठेही काहीच आढळले नाही. त्यामुळे खंडपीठातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.