देश आणि विदेशातील विमानांना सातत्याने विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर भुमिका घेतली असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तपासानुसार समाजमाध्यमांवर अशा धमक्या ज्या आयपी ऍड्रेसवरून आल्या आहेत ते आयपी ऍड्रेस
शोधून काढले आहेत. हे आयपी ऍड्रेस लंडन आणि जर्मनीतील असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. याप्रकरणी आता 10 सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत. आजही एअर इंडियाच्या अनेक विमानांना सुरक्षेविषयी धमक्या आल्याचे समोर आले आहे.