
शेअर बाजारात मंगळवारी चढ-उतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी रुपये कमावले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज शेवटच्या क्षणी 206 अंकांनी घसरून 80,157 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी घसरून 24,579 अंकांवर बंद झाला. एनटीपीसी, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले. तर आयटी, बँकिंग आणि टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.