असं काय केलं बॉसने… कर्मचारी झाले करोडपती

 

कोणत्याही ऑफीसमध्ये काम करताना बॉस इज ऑलवेज राइट हा कित्ता प्रत्येक कर्मचारी गिरवत असतो… पण ही बातमी वाचा आणि मग तुम्हीही म्हणाल बॉस असावा तर असा. या बॉसने असं काही केलं की सगळे कर्मचारीच करोडपती झाले.

आपल्या कंपनीच्या फायद्यासोबत कर्मचाऱ्यांचाही फायदा करून देणारा बॉस कोणाला नाही आवडणार..! ब्रिटनमध्ये एका व्यावसायिकानेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक धोरणांबाबत असा काही निर्णय घेतला, की सर्व कर्मचाऱ्यांना लॉटरी लागल्याची अनुभूती मिळाली.

द हट ग्रुप असे या कंपनीचे नाव असून ही कंपनी मॅथ्यू मोल्डिंग यांच्या मालकीची आहे. या व्यावसायिकाने चक्क आपल्या कंपनीचे प्रॉफीट शेअर्स कर्मचाNयांच्या नावावर केले. यामुळे कंपनीत काम करणारे कर्मचारी करोडपती झाले. या व्यावसायिकाने आपल्या वंâपनीच्या शेअर्सचे भाव तेजीत असताना हा निर्णय घेतला.

या कंपनीच्या शेअर्सची किंमत त्यावेळी ८३० पाउंड म्हणजेच तब्बल ८१८३ कोटी इतकी होती. यावेळी त्यांनी एक अनोखी स्कीम चालवली. ही स्कीम सर्व कर्मचाऱ्यांसाठी ठेवली होती. या स्कीमचा फायदा घेणाऱ्यांमध्ये कंपनीचा ड्रायव्हर तर मालक मॅथ्यू यांची सेक्रेटरीही आहे. तिला इतके पैसे यामध्ये मिळाले कि ती वयाच्या ३६ व्या वर्षीही निवृत्ती घेऊ शकते.

मॅथ्यू मोल्डींग यांना त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात फिट राहायला अधिक आवडते. त्यांना जिमिंग, प्रोटीन शेक्स, ब्युटी ब्रॅण्ड्सची आवड आहे. ते आपली लम्बोर्गिनी कार स्वतः चालवतात. संपूर्ण विश्वभ्रमंती कर्मचाऱ्या मॅथ्यू यांचे राजकीय संबंध अत्यंत चांगले आहेत.

अशी झाली कंपनीची सुरूवात

२००४ मध्ये मॅथ्यू मोल्डींग यांनी जॉन गॅलमोर यांच्या सोबत द हट ग्रुपची सुरूवात केली होती. गेल्या सोळा वर्षात मॅथ्यू यांना खुप फायदा झाला. त्यानी आतापर्यंत १.१ बिलीयन डॉलर म्हणजेच ८१२२ करोड रूपयांचा बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. द हट ग्रुप दुनियाभरातील १६४ देशात कार्यरत आहे. आपल्या शेअर्स स्कीमच्या आधारे आतापर्यंत २०० कर्मचाऱ्यांना करोडपती करण्यात यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या