
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ३०० ग्रॅम बाऊनशुगर व हेरॉईन सह दोघांना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून ३० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
अमली पदार्थाची तस्करी हा गंभीर विषय ठरला आहे. अमली पदार्थाचा विळख्यात तरुणाई अधिक गुंतत चालली आहे. पोलिसांची कार्यवाही होतं असली तरी अमली पदार्थ चंद्रपुरात येतच आहे. स्थानिक गुन्हे शाखेने 300 ग्रॅम ब्राऊन शुगर, हेरॉईन जप्त केली. आरोपीचे नाव नितीन गोवर्धन, साहिल लांबदुरवार आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोले करीत आहे.