बॉक्सिंगलाही बसतोय ‘पंच’!  सुवर्ण पदक विजेता अनंता चोपडेची खंत

363

कोरोना लॉकडाऊनमुळे बॉक्सिंग या खेळारही परिणाम झाले आहेत. बॉक्सिंग हा खेळ ‘बॉडी कॉण्टॅक्ट’ खेळ आहे. त्यामुळे या खेळाच्या सांघिक सरावालाही लकर सुरुवात होईल असे वाटत नाही. याच पार्श्वभूमीप्रेसिडेंट कप’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणार्‍या मराठमोळ्या अनंता चोपडे याच्याशी दैनिक सामना’ने साधलेला संवा

क्रीडासाधने नसल्यामुळे पंचाईत

‘हिंदुस्थानात लॉकडाऊन सुरू होण्याआधी पंजाबमधील पटियाळा येथे राष्ट्रीय संघाचे शिबिर सुरू होते. कोरोनाचे संकट नसते तर हे शिबिर पुढेही असेच सुरू राहिले असते. अखेर कोरोनामुळे शिबिर तेथेच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या घरी जावे लागले. त्यानंतर बुलढाणा येथील माझ्या घरी मी आलो; पण तेथे क्रीडासाधने उपलब्ध नसल्यामुळे पंचाईत झाली. गावानजीकच्या जागेत रनिंग, वॉर्मअपचा सराव केला. तसेच फिटनेससाठी संध्याकाळी फुटबॉलही खेळलो,’ असे अनंता चोपडे यावेळी म्हणाला.

बॉक्सिंग संघटनेकडून ऑनलाइन मार्गदर्शन

‘लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक खेळाडूला विचारणा करण्यात येत होती की, या कालावधीत तुम्ही काय करताय? घरातील सर्व बरे आहेत ना? फिटनेस कायम राहावा यासाठी कोणता व्यायाम करता? यांसारखे प्रश्न त्यांच्याकडून विचारण्यात येत होते. एवढेच नव्हे, तर संघटनेकडून फिटनेससाठी काय काय करायला हवे, याचे मार्गदर्शनही करण्यात येत होते,’ असे अनंता चोपडेने पुढे सांगितले.

माझ्या खांद्यारच कुटुंबाची जबाबदारी

‘गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य व त्यानंतर झालेल्या ‘प्रेसिडेंट कप’मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सेंट्रल रेल्केमध्ये नोकरी मिळाली. माझ्या कुटुंबासाठी ही आनंदाची बाब होती. कारण आई-वडील शेती करतात, तर मोठा भाऊ ऑटो चालवितो. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी  माझ्या खांद्याबरच होती. या नोकरीमुळे आमचा आर्थिक प्रश्न सुटला. या लॉकडाऊनमध्ये पगारही व्यकस्थित होत होता,’ असे अनंता चोपडे आनंदाने सांगतो.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवायचाय

‘कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे आणि संघटनेकडून सरावासाठी बोलाविणे यावे, असे मनापासून वाटते. मला सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवायचाय. ऑलिम्पिक, जागतिक, कॉमनवेल्थ, आशियाई या सर्व स्पर्धांमध्ये देशासाठी पदके पटकाविण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन,’ असे अनंता चोपडे आवर्जून नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या