Video – भावाच्या जागी बॉक्सिंग खेळायला गेला आणि भर मैदानातच मेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळाच्या मैदानामध्ये अनेकवेळा अपघात होता. काही वेळा हे अपघात जीवघेणेही असतात. अनेकदा खेळाडू मैदानावरच निरोप घेतात. क्रिकेटच्या मैदानामध्ये एखादा चेंडूही फलंदाजासाठी व्हिलन बनते तर बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचा ठोसा किंवा रिंग व्हिलन बनते. असाच एक प्रकार व्यावसायिक बॉक्सिंग रिंगमध्ये घडला आहे.

बुल्गारियामध्ये (Bulgaria) बॉक्सिंगदरम्यान दुखापत झाल्याने एका बॉक्सरला प्राण गमवावा लागला आहे. परंतु त्याच्या मृत्यूनंतर एक वेगळाच खुलासा झाला आहे. ज्या बॉक्सरचा मृत्यू झाला असे समजले जात होते, तो जिवंत होता आणि ज्याच्यावर काळाने झडप घातली तो त्याच्या लायसन्सवर खेळणारा त्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. यामुळे व्यावसायिक बॉक्सिंगचे आयोजन करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

व्यायसायिक बॉक्सिंगदरम्यान दुखापत झाल्याने बोरिस नावाच्या बॉक्सरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ इस्स याने खुलासा केला तो गेल्या एक वर्षापासून माझ्या लायसन्सवर स्पर्धेत भाग घेत आहे. विशेष म्हणजे इस्सच्या नावाने बोरिस खेळत होता आणि त्याच्या मृत्यूनंतर वर्ल्ड बॉक्सिंग काऊन्सिलने 21 वर्षीय इस्सच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. यानंतर इस्स याने फेसबुकवर पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला.

कसा झाला मृत्यू?
बोरिस आर्दिट मुरजा याच्याविरुद्ध मैदानात उतरला होता. दोघांमध्ये रिंगमध्ये घमासान फाईट झाली. यादरम्यान मुरजा याचा एक फटका बोरिसला लागला आणि तो कॉर्नवर धडपडत पडला. भर मैदानातच त्याचा मृत्यू झाला. मैदानावर उपस्थित वैद्यकिय पथकाने त्याच्यावर उपचार केले, परंतु त्याचे शरीर थंड पडले होते.