चिमुरड्याला बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, बापाला पडल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अझिरुद्दिन शेख असं या हैवान बापाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेख याच्या बायकोनेच बनवला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्ल्यात राहणारा शेख हा व्यवसायाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. गेल्या शुक्रवारी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेख त्याच्या चार वर्षांच्या मुलाला बेदम मारत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. शेख याच्या पत्नीनेच तो व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. त्यानंतर व्हिडीओत दिसणारा इसम हा शेख असल्याचं उघड झालं होतं.

शेख याला अटक केल्यानंतर त्याने मुलगा मोठ्याने रडत असल्यामुळे त्याला मारल्याचं कबूल केलं. शेख याच्या बायकोने तो व्हिडीओ तिच्या बहिणीला पाठवला होता आणि तिथूनच तो त्याच्या नातेवाईकांकरवी व्हायरल झाला, असंही पोलीस तपासात उघड झालं. शेख याच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं निष्पन्न झालं. बालहक्क न्यायालयाने शेख याला काही शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.