क्रूझर दुचाकीच्या धडकेत तरुण ठार

47
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

शहरातील गंगाखेड रोडवर भरधाव वेगाने परळीकडे येणाऱ्या क्रूझर गाडीची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार ध़डक बसली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.अमोल नवनाथ जगताप असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नितिन अनंत किरवले असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

परळीपासून जवळच गंगाखेड रस्त्यावरील सबस्टेशन जवळ सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील जखमींवर परळी येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या