धक्कादायक! हिंदुस्थानात दर मिनिटाला 6 जणांना ब्रेन स्ट्रोक

3365

हिंदुस्थानात दर मिनिटाला सहा जणांना ब्रेन स्ट्रोक होतो. स्ट्रोक हा वाचविता येतो. त्यासाठी जीवनशैलीत बदल करून योग्य काळजी घेतली तर हा आजार दूर ठेवता येतो, हे जागतिक स्तरावर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

जागतिक न्यूरॉलॉजी महासंघाच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी गुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक दोन सेकंदात एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होतो. गेल्या 25 वर्षांत ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. स्ट्रोक झाल्यानंतर 30 टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो, तर 30 टक्के व्यक्तींना दीर्घकालीन अपंगत्व येते. झालेल्या दर दोन सेकंदात एकाला ब्रेनस्ट्रोक होतो. साठ टक्के रुग्ण या आजारामुळे दगाकतात. तर 30 टक्के रुग्णांना कायमचे अंपगत्क येते.

चाळिशीच्या आता स्ट्रोक
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख कमी होतो. हा आजार अत्यंत गंभीर असून हिंदुस्थानात दर मिनिटाला सहा व्यक्तींना बेन स्ट्रोक होतो. हा आकडा एका वर्षात सुमारे 20 लाखापर्यंत पोहोचतो व त्यापैकी जवळपास सात लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे हिंदुस्थानताली ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी 20 टक्के नागरिकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे.

  • 10 कोटी 70 लाख रुग्ण दरवर्षी बाधीत, त्यापैकी जेमतेम 6 कोटी जगतात
  • पक्षाघाताचे 80 टक्के रुग्ण दारिद्रय़ रेषेखालील
  • हिंदुस्थानींमध्ये ब्रेनस्ट्रोकचे प्रमाण 20 टक्के
आपली प्रतिक्रिया द्या