Paris Olympic 2024 : हिंदुस्थानचा कुस्तीपटू अमन सहरावतला कांस्य पदक

हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा 13-5 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अमनच्या विजयामुळे हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. अशा प्रकारे हिंदुस्थानकडे आता पाच कांस्य पदक व एक रौप्य पदक आहे.