Breaking – घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. घरगुती सिंलिंडरचे दर आता 50 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता एका सिलिंडरसाठी सामान्यांना 1053 रुपये मोजावे लागमार आहेत. त्यासोबत 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरातही 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 8.50 ऱुपयांची घट करण्यात आली आहे.