Breaking News: मिंधे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल

बदलापूरमध्ये एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जनतेचा उद्रेक झाला होता. यावेळी एका महिला वृत्तप्रतिनिधीला अर्वाच्य भाषेत मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवीगाळ करत तिचा अपमान केला होता. या घटनेनंतर वामन म्हात्रे यांच्याविरोधात जनतेने संताप व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर जनतेचा रेटा आणि शिवसेनेच्या दणक्यानंतर म्हात्रे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बदलापूर पोलीस ठाण्यासमोरील सहा तासांच्या आंदोलनानंतर अखेर मिंधे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.