पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळले, विमानात 100 प्रवासी

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे A320 हे विमान कोसळल्याने वृत्त आहे. जीन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Jinnah International Airport) हे विमान क्रॅश झाले आहे. या विमानाने लाहोर विमानतळावरून कराचीसाठी उड्डाण घेतले होते.

विमानात पायलट व इतर सदस्यांसह 100 प्रवासी होते. विमानातील प्रवसांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त देण्यात आलेले नाही. जियो न्यूजने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, जीन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Jinnah International Airport) हे विमान अपघातग्रस्त झाले. विमानाचे लँडिंग करताना हा अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या