
केरळच्या अलप्पुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वॉर्डात कोरोना काळात अनोखे लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यात वधूने पीपीई किट्स घातले होते.
कारण नवऱया मुलाला कोरोना झाला होता. जिल्हाधिकाऱयाच्या परवानगीने हा विधी पार पडला. अलप्पुझा येथे राहणारे सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वार्डात लग्न केले आहे. या दोघांचे लग्न यापूर्वीच ठरले होते. परंतू नवऱयाला कोरोना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

























































