पूर्व उपनगरातील पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

217

मुंबईतील पुलांची दुरुस्ती आणि अतिधोकादायक पुलांचे नव्याने बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये पूर्व उपनगरातील सहा पुलांची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असून मरीन लाइन्स चंदनवाडी पूल, कुर्ला नेहरूनगर पूल आणि साकीनाका खैरानी रोडजवळील पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत.

या पुलांची दुरुस्ती होणार
‘टी’ विभागातील (मुलुंड) वीनानगर पाइपलाइनवरील पादचारी पूल.
टेंभीपाडा तानाजीनगर पाइपलाइन रोडवरील पूल.
मुलुंड पूर्व ‘90 फूट’ रस्त्यावरील राजर्षी शाहू को-ऑप. सोसायटीजवळील पूल.
‘90 फूट’ रस्ता साने गुरुजी मार्ग येथील पूल.
‘एस’ विभाग नाहूर रेल्वे स्टेशनजवळील कोपरकर मार्ग नाला पूल.
नवघर रोड टाटा कॉलनीजवळील पूल.

आपली प्रतिक्रिया द्या