मास्कपासून ड्रेस!

कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी जगभरातील लोक नवनवीन संशोधन करत आहेत. जे देश कोरोनामुक्त झाले आहेत अशा देशांमध्ये मास्कची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उद्भवत आहे. ब्रिटनमधील एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार तिथे जवळजवळ 100 कोटींपेक्षा जास्त मास्क वापरून फेकून देण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील डिझायनर टॉम सिल्वरवूड याने त्याच्या क्रिएटिव्हिटीचा वापर करत फेकलेल्या 1500 मास्कचा आणि पीपीई कीटचा वापर करून ब्रायडल ड्रेस बनवला आहे. हा ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यात वापरण्यात आलेले मास्क हे अपसायकल म्हणजे पुनर्वापर करण्याजोगे स्वच्छ केलेले पांढऱया रंगाचे मास्क आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या