व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी BMW कार नदीत पाडली, पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर आपला व्हिडीओ व्हायरल व्हावा म्हणून कोण कुठे कधी काय करेल याचा काहीही नेम नाही. अलीकडेच स्पेनमध्ये एका तरुणाने प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी आपली महागडी बीएमडब्लू कार नदीत पाडली. याप्रकरणी पोलिसांनी या तरुणाला पर्यावरणाला हानी पोहचविण्याचा आणि रस्ता सुरक्षिततेशी संबंधित नियम मोडल्याचा आरोप करत अटक केली आहे.

हा तरुण ब्रिटनचा नागरिक आहे. पोलिसांनी या तरुणाच्या नावाचा खुलासा केला नाही. या तरुणाने बीएमडब्ल्यू कार मार्बेला नदीत खाली पाडताना व्हिडिओ शूट करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. मात्र नंतर त्याने तो व्हिडीओ इंस्टाग्रामवरून डिलीट केला. त्याने हा व्हिडीओ डिलीट करण्याच्या आगोदरच पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिला होता. पोलीस या तरुणाचा शोध घेत होती.

पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला असता त्याची तपासणी करताना पोलिसांना त्याकडून बनावट कागदपत्रे मिळाली. तसेच त्याकडे एकच नंबर प्लेट असलेल्या दोन कार मिळाल्या. घटनेनंतर पोलिसांनी नदीतून कार बाहेर काढली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.