Video – मेंदूचे ऑपरेशन सुरू असताना महिला व्हायोलिन वाजवत होती, डॉक्टरांचाही सलाम

4818

थोडे जरी दुखत असले तरी डॉक्टर बऱ्याचदा आरामाचा सल्ला देतात. आपणही गोळ्या घेऊन पडून राहतो. त्यात शस्त्रक्रिया झाली असेल तर आवर्जुन आराम करण्यास सांगितले जाते. मात्र याउलट ब्रिटनमध्ये एक महिला मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान व्हायोलिनवादनामध्ये व्यग्र असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ब्रिटनमधील एका रुग्णालयामध्ये ब्रेन ट्यूमर असणाऱ्या महिलेवर शस्त्रक्रिया झाली. मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना महिला व्हायोलिन वाजवत होती. डॅगमर टर्नर असे या तरुणीचे नाव आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आपण व्हायोलिन वाजवणे विसरू नये म्हणून असे केल्याचे महिलेने सांगितले. ही महिला गेल्या 40 वर्षांपासून व्हायोलिन वाजवते आणि तिला ते आवडते. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले.

रुग्णालयातील डॉक्टर आश्कन यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान टर्नर अनेक धून वाजवत होती. तसेच तिच्या मेंदूतील 90 टक्के ट्यूमर काढून टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर टर्नरने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच व्हायोलिन वाजवणे माझी आवड असून मी 10 वर्षांची असल्यापासून हे वाजवते, असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या